breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: राज्यातील पाचशेपेक्षा अधिक नमुन्यांत दुहेरी उत्परिवर्तन

जालना |

करोना विषाणूची जनुकीय संरचना बदलून त्यामध्ये दुहेरी उत्परिवर्तन झाल्याच्या संदर्भात महाराष्ट्रातून २ हजार ४०० नमुने केंद्राकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १ हजार १०० नमुन्यांची तपासणी झाली असून त्यापैकी ५२० नमुन्यांत दुहेरी उत्परिवर्तन (म्युटेशन) झाल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून समोर आले आहे. ज्या शहरांत या संदर्भात नमुने घेतले तेथे करोना विषाणू संसर्ग अधिक प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले,की केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत झालेल्या दूरचित्र संवाद बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून करोना विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीविषयी चर्चा केली. ब्राझिलियन आणि ब्रिटनचे नवीन दोन करोना विषाणू प्रकार देशात आढळून आले आहेत.

दुहेरी उत्परिवर्तनाच्या विषाणूमुळे महाराष्ट्रात होणाऱ्या करोना प्रसारावर सध्याचे लसीकरण परिणामकारक आहे का, नवीन विषाणू प्रकारामुळे अधिक संसर्ग आणि मृत्यूचा धोका वाढला आहे का, त्यासाठी वेगळे उपचार करावे लागतील का, इत्यादी प्रश्न आपण या वेळी उपस्थित केले. ‘नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’ ही केंद्राची संस्था नवीन विषाणूच्या संदर्भात सध्या संशोधन करीत आहे. जनुकीय बदल झालेल्या विषाणूवरील सध्याच्या लसीच्या परिणामकारकतेबाबत सध्या केंद्रीय पातळीवरील दोन प्रयोगशाळेत अभ्यास सुरू आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’ ही संस्था अभ्यास झाल्यावर देशातील राज्यांना या संदर्भातील तपशील लेखी स्वरूपात सादर करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत सांगण्यात आले. वैज्ञानिकांनी करोना विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाबाबत महाराष्ट्रासह देशातील दहा राज्यांतील नमुने अभ्यासासाठी घेतलेले आहेत. रेमडेसिविरची निर्यातबंदी केलेल्या १५ निर्यातदारांकडील लस महाराष्ट्रासाठी द्यावी, पंतप्रधान कार्यालयाने यामध्ये लक्ष घालून निर्यातदारांनी भारतात रेमडेसिविर विक्रीची परवानगी मिळवून द्यावी, राज्यातील ४२०० केंद्रांसाठी दररोज आठ लाख लशींची उपलब्धता करवून द्यावी, इत्यादी मागण्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत.

वाचा- #Covid-19: टाटांनी पुन्हा करुन दाखवलं!; रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button