breaking-newsTOP Newsक्रिडामनोरंजन

पाहा कोहलीची ‘ती’ ऑडी कार; आता आहे धूळखात पडलेली

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची एक कारची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कारण ती कार सध्या मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये खटारा झालेली आहे. कोहलीने ही कार ज्याला विकली होती त्याच्याविरुद्ध घोटाळ्याचा आरोप असल्यामुळे पोलीस कारवाईमध्ये ही कार जप्त करण्यात आली. पोलीस ठाण्यामध्ये भारतीय सुपरस्टारची कार आता हलाखीच्या स्थितीत आहे. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या आलिशान कारचे दार तुटलेले आहे. टायर खराब झालेले असून धुळीमुळे कारचा पांढरा रंग आता मळकट झाला आहे. कारचे सामान खराब झाले असून आतमध्येही तुटलेले आहे. कोहलीची ही दुर्दैवी कार ऑडी आर-८, २०१२ चे मॉडेल आहे. त्याने ही कार घेतल्यानंतर 2013 मध्ये त्याच्यासोबत रॉयल चॅलेंजर बँगलोरचा खेळाडू ख्रिस गेलला यातून फेरफटका मारताना पाहण्यात आले होते.

कोहलीने नवी कार विकत घेतल्यानंतर ऑडी आर-८ वर्ष २०१६ एका एजंटच्या माध्यमातून विकली होती. एजंटकडून ज्याने ही कार विकत घेतली होती त्याचे नाव समीर ठक्कर होते. दोन महिन्यांनंतर त्याच्यावर कॉल सेंटर घोटाळ्याचा आरोप निश्चित झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ठक्करने कोहलीची ही कार आपल्या मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी अडीच कोटी रुपयांत विकत घेतली होती. दरम्यान, घोटाळ्याच्या संदर्भात केलेल्या छापेमारीमध्ये पोलिसांनी ठक्करची संपत्ती जप्त केली. त्यात विराट कोहलीच्या कारचाही समावेश होता. जप्त करण्यात आल्यानंतर कारला पोलीस ठाण्यामध्ये अन्य वाहनांप्रमाणे ठेवण्यात आले.

आता विराट कोहलीचा या कारसोबत किंवा या प्रकरणासोबत कुठलाही संबंध नाही. त्याने आपली कार विकताना कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केली होती. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button