breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालकमंत्र्यांची भेट घेणे, काहीच गैर नाही – आयुक्त श्रावण हर्डिकर

पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यामुळे त्यांचे स्वागत करून भेट घेणे काहीच गैर नाही,’ असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षातर्फे पालकमंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम पक्षाच्या शहर कार्यालयात झाला. तेथे जाऊन हर्डीकर यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या मुद्द्यांचा गाजावाजा झाला. ते भाजपचे प्रवक्ते असल्याची टीका विरोधकांनी केली. त्याबाबत स्पष्टीकरण देताना हर्डीकर म्हणाले, ‘शहरात पालकमंत्री प्रथमच आले असताना त्यांचे स्वागत करणे ही गोष्ट औचित्यभंगाची होत नाही; तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख करून घेणे, हा कर्तव्याचा भाग आहे. त्याच उद्देशाने मी तेथे गेलो होतो. इमारतीच्या खाली प्रवेशद्वारावर खूप वेळ वाट पाहिली. परंतु, पालकमंत्र्यांना काहीसा उशीर झाला. त्यानंतर त्यांना लगेचच पालखी सोहळ्यासाठी जायचे होते. त्यामुळे मी कार्यालयात जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यामध्ये गैर काहीच नाही. बैठकीला उपस्थित नव्हतो. किंबहुना, तेथील पाहुणचारदेखील टाळला. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button