पिंपरी / चिंचवड

पार्थ पवार यांच्यासाठी वाकड येथील महिलांची प्रचार मोहीम

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा झंजावात सुरू झाला आहे. त्यात वाकड येथील महिला देखील मागे राहिलेल्या नाहीत. माजी नगरसेविका स्वाती कलाटे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मेळावा, बैठका, भेटी-गाठी घेऊन पार्थ पवार यांचा प्रचार केला जात आहे. त्याला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे.

वाकड येथे रविवारी महिलांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या निता पाटील होत्या. यावेळी अश्विनी पाटील, विभा बोके, अदिती कदम, सुचित्रा घाटगे, मंजिरी कदम, मणिषा कदम, पूजा कदम, आरती राव, स्मिता पाल्हाळ, वैशाली काळभोर, आश्विनी क्षीरसागर आदींसह सुमारे 600 महिला उपस्थित होत्या. नगरसेवक मयूर कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला.

राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात आता महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या देखील सक्रिय झाल्या आहेत. वाकडमध्ये महिलांचे संघटन तयार करून त्यांना संबोधीत केले जात आहे. माजी नगरसेविका स्वाती कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशा तीन सत्रात लोकांच्या भेटी-गाठी घेऊन पक्षाने केलेल्या विकास कामांची माहिती घराघरात पोहोचविण्याची मोहिम आखली आहे. त्याला महिला वर्गाचा प्रतिसाद मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button