breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पार्ट टाइम, वर्क फ्रॉम होमच्या जाहिरातींना भुलू नका, मुंबई सायबर पोलिसांचे आवाहन

मुंबई – कोरोना संसर्गामुळे पुकारलेल्या लॉकडाउनमुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मिळेल ते काम करण्यास तरुणाई पुढे आली. त्यातच पार्ट टाइम आणि वर्क फ्रॉम होमच्या अनेक जाहिराती हल्ली सोशल मीडियावर दिसतात. मात्र या जाहिरातींना न भुलण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

बेरोजगारीच्या संकटाचा फायदा घेऊन काही जण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती चोरुन त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आलेत. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावरील अफवांचे प्रमाणही वाढलं आहे. पोलिसांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत आणि नोकरीपासून ते घर बसल्या पैसे कमवण्याच्या जाहिरातींपर्यंत अनेक विषयांसदर्भातील अफवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहे. अशीच एक अफवा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे घरबसल्या मोबाईलचा वापर करुन दिवसाला काही हजार कमवा. मात्र अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

काय आहे अफवा?

या मेसेजमध्ये एक पार्ट टाइम नोकरी करण्याची संधी चालून आली आहे असा दावा करण्यात आलाय. या माध्यमातून दिवसाला दोनशे ते तीन हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल. दिवसातून केवळ १० ते ३० मिनिटं काम करावं लागेल. खालील लिंकवर क्लिक करुन नाव नोंदवा. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला ५० रुपये मिळतील, असं सांगून खाली एक लिंक दिलेली असते.

पोलिसांचं आवाहन…

हा फसवणुकीचा प्रकार असून नागरिकांनी याला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) रश्मी करंदीकर यांनी हा मेसेज म्हणजे फसवणुकीचा प्रकार असल्याची माहिती दिली. नागरिकांनी या लिंकवर क्लिक करु नये असं आवाहनही करंदीकर यांनी माध्यमातून नागरिकांना केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button