breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तान सरकारने बदलले आरोग्यमंत्री

इस्लामाबाद – कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तान सरकारने नवीन आरोग्य मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी आरोग्य मंत्रीपदी डॉ. फैसल सुलतान यांची नेमणूक केली आहे.

पाकिस्तानात कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाखांच्या पार गेली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरत असल्याने इम्रान खान सरकारवर चौफेर टीका होत होती. त्यामुळे मागील आठवड्यात आरोग्यमंत्री डॉ. झफर मिर्झा यांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधान इम्रान खान यांनी काल मिर्झा यांच्या जागी डॉ. फैसल सुलतान यांची नियुक्ती केली आहे. ऑगस्ट 2018मध्ये सत्तेवर आलेल्या इम्रान खान सरकारमध्ये सुरुवातीला आमीर कयानी हे आरोग्यमंत्री होते. देशातील औषधांच्या किंमती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने कयानी यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यांच्या जागी मिर्झा आरोग्यमंत्री झाले. मिर्झा यांच्या राजीनाम्यानंतर सुलतान आरोग्यमंत्री झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button