breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानातील निवडणूक प्रचार शिगेला

इस्लामाबाद – पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणूकीस केवळ 3 दिवस राहिलेले असताना सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी देशभर सुरू केलेला निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र काही राजकीय पक्षांना या निवडणूकीबद्दल प्रचंड औदासिन्य वाटते आहे. याचे कारण मात्र प्रत्येक राजकीय पक्षाकडून हातचे राखून ठेवल्यासारखे व्यक्‍त होत आहे.

पाकिस्तानातील निवडणूक आयोगकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार संसदेच्या 272 जागांसाठी देशभरात 3,459 उमेदवार उभे आहेत. तर चार प्रांतांमधील 577 विधानसभा जागांवर मिळून 8,396 उमेदवार उभे आहेत. 25 जुलैला होणाऱ्या या निवडणूकांसाठी माजी क्रिकेटपटू इमरान खान यांच्या “पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ या पक्षाला दहशतवाद्यांकडून छुपा पाठिंबा मिळत आहे.

या पक्षाच्या विरोधकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप आहे. “पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ या पक्षाने मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाने मात्र आपल्याविरोधात लष्कराकडून कारस्थान केले जात असल्याचा आरोप केला आहे. स्वतः नवाझ शरीफ यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पंजाब प्रांतातील काळजीवाहू सरकार इमरान खान यांच्या पक्षास सहाय्य करत असल्याचा आरोप पीएमएलचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button