breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते रजा महमूद खान घरी परतले

लाहोर – गेल्या सात महिन्यांपासून बेपत्ता असलेले येथील सामाजिक कार्यकर्ते रजा महमूद खान घरी परतले आहेत अशी माहिती स्थानीक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र गेल्या सात महिन्यांपासून ते कोठे होते याबद्दल कोणतीही माहिती अजुन मिळालेली नाही.

सात महिन्यांपुर्वी म्हणजेच 2 डिसेंबर 2017 रोजी लाहोर येथील मॉडेल कॉलनी येथे असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानातून काही अनोळखी व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले होते. पाकिस्तानातील मुले आणि भारतीय मुलांमधील मैत्रीचा पुढाकार घेणाऱ्या अगाज-ई-दोस्ती या कार्यक्रमाच्या संयोजना वरुन त्यांचे अपहरण झाल्याची शक्‍यता स्थानीक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली होती.

विविध संघटनांचे कार्यकर्ते त्यांचे मित्र आणि कुटुंबियांसह, त्यांच्या सुटकेसाठी तसेच तपासासाठी आंदोलन करत होते. डॉन या वृत्तपत्राणे दिलेल्या माहिती नुसार खान यांची प्रचंड छळवणुक झाली असण्याची शक्‍यता आहे त्याच बरोबर खान यांचे अपहरण करणाऱ्यांना सामाजीक शांततेसाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना लक्ष्य करायचे होते.

या बद्दल बोलताना पंजाब प्रांतातील पोलिसांनी सांगितले की, 10 दिवसांपूर्वी त्यांना खान हे सापडले मात्र ते कोठे सापडले याबद्दल त्यांनी अधिक माहीती देण्याचे टाळले. तसेच त्यांनी पुढे सांगीतले की, खानयांची प्रकृती उत्तम असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या बद्दल अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले.

खान यांच्या अपहरणानंतर अंतरराष्ट्रीय मानवाधीकार आयोगानी याची दखल घेताना स्थानीक प्रशासनाला सामाजीक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button