breaking-newsराष्ट्रिय

पाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते मनिष तिवारी यांनी भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्यावर टिका केली आहे. धनोआ यांनी काल चंदीगड येथील एका कार्यक्रमात राफेल विमानांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन तिवारी यांनी धनोआ यांचे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. राफेल भारतीय दलामध्ये दाखल झाल्यानंतर पाकिस्तानला नियंत्रण रेषेजवळ फिरकताही येणार नाही, असं मत धनोला यांनी व्यक्त केले होते. यावरुनच तिवारी यांनी धनोआ यांना लक्ष्य केले आहे.

तिवारी यांनी धनोआ यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये धनोआ यांचे वक्तव्य हे राजकीय हेतून प्रेरीत (पॉलिटीकली लोडेड) असल्याचे तिवारी म्हणाले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘सामान्यपणे वर्दीमधील लोकांबद्दल मी अशा सार्वजनिक माध्यमांवर मतप्रदर्शन करत नाही. मात्र मी हे विनम्रपणे सांगतो की एअर चीफ मार्शल धनोआ यांचे हे (राफेलसंदर्भातील) वक्तव्य निवडणुकांच्या काळात राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे वाटते. भारताच्या सध्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकणारे हे वक्तव्य आहे. हे वक्तव्य टाळता आले असते.’

Manish Tewari

@ManishTewari

I usually refrain from joining issues publicly with our people in uniform. Regrettably this statement by Air Chief Marshal Dhanoa is both politically loaded in election time & has implications on India’s current deterrence capabilities.Very Very avoidable. https://www.aninews.in/news/national/general-news/once-rafales-come-pak-wont-come-near-loc-or-border-iaf-chief-dhanoa20190325130606/ 

Once Rafales come, Pak won’t come near LoC or border: IAF Chief Dhanoa

Chandigarh [India], March 25 (ANI): Indian Air Force (IAF) Chief B S Dhanoa on Monday said that Rafale jets will the best combat aircraft in the Indian sub-continent and once these are inducted,…

aninews.in

722 people are talking about this
सोमवारी चंदीगड एअर बेसवर चिनुक हेलिकॉप्टर देशसेवेत दाखल झाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या एअर चीफ मार्शल धनोआ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धनोआ म्हणाले, ‘राफेल विमानांचा एकदा का भारतीय हवाई दलात समावेश झाला की, त्यानंतर शेजारी देशाचे कोणतेही विमान नियंत्रण रेषेजवळच काय सीमेवरही दिसणार नाही. जेव्हा राफेल येईल आपल्या हवाई दलाची क्षमता अनेक पटींनी वाढेल. आपली ताकद इतकी वाढेल की, पाकिस्तानजवळ त्याला उत्तर देण्यास काहीही नसेल.’ चिनुक हेलिकॉप्टरबद्दल बोलताना धनोआ यांनी ‘देश आज अनेक सुरक्षा आव्हानांचा सामना करीत आहे. या काळात विविध क्षेत्रात चिनुक खूपच चांगली कामगिरी बजावू शकेल. हे हिलकॉप्टर सैन्य मोहिमांसाठी फायदेशीर ठरेल तसेच दिवसाबरोबरच रात्रीही आपली सेवा देऊ शकेल. आकाशात भारताची ताकद वाढवण्याबरोबरच युद्धावेळी ते ‘गेम चेंजर’ही ठरेल,’ असे मत व्यक्त केले.

तिवारी यांनी भाजपा आणि काँग्रेसमध्ये राफेल करारावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही टिका केली आहे. तर दुसरीकडे धनोआ यांनी केलेले राफेसंदर्भातील वक्तव्य हे भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केले होते. भारतीय हवाई दलाने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या हद्दीमधील बालाकोट येथील दहशवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button