breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानचे संतापजनक कृत्य

भारतीय उच्चायुक्तांना पाक मधील गुरूद्वारात अनुमती नाकारली 
इस्लामाबाद – भारताचे पाकिस्तान मधील उच्चायुक्त अजय बिसारिया हे आवश्‍यक त्या सर्व पुर्वपरवानग्या घेऊन आज रावळपिंडी जवळील गुरूद्वारा पंजा साहिब येथे आपल्या पत्नीसह दर्शनासाठी गेले होते पण त्यांना तेथे प्रवेश करण्यास पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अनुमती नाकारल्याने त्यांना तेथून हात हलवत परतावे लागले आहे.

पाकिस्तानच्या या संतापजनक कृत्याची भारताने गंभीर दखल घेतली असून भारताने हा विषय त्यांच्या विदेश मंत्रालयाकडे उपस्थित केला आहे. बिसारिया यांना गेल्या दोन महिन्यात दोनदा पंजासाहिब मधून दर्शन न घेताच परतावे लागले आहे. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांनी तेथे दर्शनाला जाण्याचा प्रयत्न केला होता तेव्हाही त्यांना तेथे अनुमती नाकारली होती. पाकिस्तानातील शीख नागरीकांना तेथील भारतीय दूतांना भेटण्यासही अनुमती दिली जात नाही.

पाकिस्तानातील शीख धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी आलेल्या नागरीकांना खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्याचे काम पाकिस्तानकडून सुरू असते. भारत आणि पाकिस्तानातील शिख नागरीकांना एकमेकांच्या देशातील धार्मिक स्थळांना भेटीदेण्यासाठी अनुमती देण्याचा करार 1974 साली झाला आहे त्यात पाकिस्तानने अनेक वेळा अडथळे आणले आहेत.

गुरूद्वारा डेरासाहिब येथे महाराजा रणजीतसिंग यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी तीनशे भारतीय शीख नागरीकांना पाकिस्तान सरकारने व्हिसा जारी करण्यात आला आहे. 21 ते 30 जून या कालावधीत हा उत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर हा कटुता निर्माण करणारा प्रसंग घडल्याने भारताने त्याविषयी पाकिस्तानी सरकारकडे विचारणा केली आहे त्यावर त्यांच्याकडून अजून कोणताही खुलासा उपलब्ध झालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button