breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ फरार घोषित

इस्लामाबाद – आर्थिकदृष्ट्या विकलांग झालेल्या पाकिस्तानचे कोरोना महामारीने कंबरडे मोडले आहे. तरीही पाकिस्तानातील सुडाचे राजकारण संपलेले नाही. पाकिस्तानने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पुन्हा एकदा फरार घोषित केले असून नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या ताब्यात द्यावे, असे निवेदन इंग्लंड सरकारला दिले आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या अंतर्गत व्यवहारांचे सल्लागार शहजाद अकबर यांनी ही माहिती दिली आहे.

शहजाद अकबर यांनी सांगितले की, नवाज शरीफ हे इंग्लंडमध्ये उपचार घेण्यासाठी चार आठवड्यांसाठी इंग्लंडला गेले होते. चार आठवड्यांचा त्यांना दिलेला जामीन गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्येच संपलेला आहे. त्यानंतर सहा महिने उलटून गेले तरी नवाज शरीफ हे पाकिस्तानात परतलेले नाहीत. त्यामुळे पाकिस्तान नवाज शरीफ यांना फरार असल्याचे मानते. पाकिस्तानी सरकारने इंग्लंड सरकारला त्यांच्या प्रत्यार्पणासाठी निवेदन पाठविले आहे.

1986मध्ये नवाज शरीफ हे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी शरीफ यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लाहोरमधील सरकारी जमीन अधिग्रहित केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. लाहोरच्या न्यायालयाने नवाज शरीफ आणि अन्य आरोपींच्या विरोधात अटक वॉरंट काढलेले आहे. नवाज शरीफ सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहेत व त्यांना डॉक्टरांनी प्रवास करण्यास मनाई केली आहे. नवाज शरीफ यांनी आपल्या वकिलामार्फत आपला वैद्यकीय अहवाल लाहोर उच्च न्यायालयात यापूर्वीच सादर केलेला आहे. कोरोना साथीच्या आजारांमुळे डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केली आहे. नवाज शरीफ यांना मधुमेह, हृदय, मूत्रपिंड आणि रक्तदाब यांच्या संबंधित अनेक आजार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button