breaking-newsआंतरराष्टीय

राजकीय फायद्यासाठी तामिळी कैद्यांच्या सुटकेची शक्‍यता

कोलोंबो- श्रीलंकेच्या राजकीय रस्सीखेचीमध्ये राजकीय लाभासाठी सर्व तामिळी कैद्यांची सुटका केली जाण्याची शक्‍यता आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्र राजपक्षे यांचे खासदार पुत्र नमल यांनी रविवारी याबाबतचे सूतोवाच केले. अल्पसंख्यांक तामिळ समाजाची बऱ्याच काळापासूनची ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्‍यता आहे, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना आणि पंतप्रधान महिंद्र राजपक्षे हे लवकरच या संदर्भात निर्णय घेतील, असे नमल यांनी तामिळ भाषेतील ट्‌विटमध्ये म्हटले आहे. “एलटीटीई’विरोधातील युद्ध 2009 मध्ये संपले. तेंव्हापासून श्रीलंका सरकारने तामिळी कैद्यांच्या सुटकेची मागणी धुडकावून लावली होती. तामिळी कैदी हे राजकीय कैदी असल्याचा दावा सरकारने नाकारला होता. तर या कैद्यांना कोणत्याही औपचारिक आरोपांशिवाय दहशतवाद विरोधी कायद्याखाली दीर्घ काळापासून डांबण्यात आल्याचे तामिळी जनतेचे म्हणणे आहे.

श्रीलंकेच्या संसदेत 225 सदस्य आहेत. त्यापैकी राजपक्षे यांच्या बाजूला 100 तर रनिल विक्रमसिंघे यांच्या बाजूला 103 खासदर आहेत. “तमिळ नॅशनल अलायन्स’ या तमिळींच्या पक्षाचे सर्वाधिक 22 खासदार संसदेत आहेत. या पक्षाने राजपक्षे यांना विरोध करण्याचे निश्‍चित केले आहे. मात्र उपमंत्री पदाचे आश्‍वासन देऊन राजपक्षे यांनी पक्षाच्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. त्या पक्षाचे 4 जण राजपक्षे यांच्या बाजूने मतदान करतील, असा अंदाज आहे. तामिळी कैद्यांच्या सुटकेनंतर उर्वरित 15 खासदारही राजपक्षे यांच्याबाजूने मतदान करण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button