breaking-newsआंतरराष्टीय

पाककडून कुलभूषण प्रकरणाची पुनरावृत्ती? आणखी एका गुप्तहेराला पकडल्याचा दावा

कुलभूषण जाधव प्रकरणानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर खोटा आरोप करीत एका कथीत भारतीय गुप्तहेराला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या ARY NEWS या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या गुप्तहेराला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील डेरा गाजी खान जिल्ह्यातून पकडण्यात आले आहे. लाहोरपासून ४०० किमी अंतरावरील हे ठिकाण आहे.

राजू लक्ष्मण असे या कथीत हेराचे नाव आहे. पाकिस्तानी पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने आपण भारतीय नागरिक असून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हेरगिरी करीत होतो, अशी कबूली दिली असल्याचे पाकिस्तानी माध्यमातील वृत्तातून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानी पोलिसांचे म्हणणे आहे की, ज्यावेळी राजूला ताब्यात घेण्यात आले तेव्हा तो बलुचिस्तानमार्गे डेरा गाजी खान जिल्ह्यात प्रवेश करीत होता. ताब्यात घेतल्यानंतर त्याला अज्ञातस्थळी नेण्यात आले असून या ठिकाणी पाकिस्तानी अधिकारी त्याची चौकशी करीत आहेत.

पाकिस्तानने यापूर्वी कुलभूषण जाधव यांनाही कथीत हेर असल्याचा दावा करीत तुरुंगात डांबले आहे. या आरोपांखाली त्यांना फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात भारताने हस्तक्षेप करुन आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतल्याने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती मिळाली आहे. याप्रकरणी कुलभूषण यांना आपली बाजू मांडण्यासाठी कोणतीही राजकीय मदत न दिल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानच्या निर्णयाला चुकीचे ठरवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button