breaking-newsमुंबई

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेवर पालघर आणि केळवे दरम्यान चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर रुळ दुरुस्ती करणारे टॅम्पिंग मशीन घसरल्याने लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल गाड्यांची वाहतूक १५ ते २० मिनिटे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक एक ते दीड तास उशिराने सुरु आहे.

शुक्रवारी मध्यरात्री पालघर आणि केळवे दरम्यान मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर रुळ दुरुस्ती करणारे टॅम्पिंग मशीन घसरले. यामुळे सुमारे तीन ते चार तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याचा फटका लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना बसला. लोकल गाड्यांची वाहतूक १५ ते २० मिनिटे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक एक ते दीड तास उशिराने सुरु आहे. स्टेशनवर याबाबत उद्घोषणा होत नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button