breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

पश्चिम बंगालमध्ये भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याचा अंतिम दिनी डायमंड हार्बर भागात जेपी नड्डा यांची आज प्रचार सभा होती. सभेसाठी या भागाकडे येत असताना त्यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली.

ही दगडफेक तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. परंतु, हे आरोप तृणमूल पक्षाने फेटाळून लावले आहेतपश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या राज्यात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे.

डायमंड हार्बर पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचा मतदार संघ आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षा त्रुटीचे पश्चिम बंगाल सरकारकडून उत्तर मागितले आहे. याबाबत राज्य सरकारला पत्रही पाठविण्यात आले आहे.

BJP chief JP Nadda’s convoy attacked in Bengal
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button