breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

पश्चिम बंगालमध्ये भाजप दुहेरी आकडा गाठणार नाही – प्रशांत किशोर

अंदाज चुकला तर ट्वीटर सोडण्याचा दावा  

पिंपरी | टीम ऑनलाइन

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच “पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा दावा रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. हा अंदाज चुकला तर ट्वीटर सोडण्याचा दावाही त्यांनी केला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे भाजपने निवडणुकीची आक्रमक तयारी केली असतानाच, रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दावा केला आहे की, “पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल.” म्हणजेच भाजपला तिहेरी आकडा गाठता येणार नाही.

त्यांनी लिहिलं आहे की, “मीडियातील काही चॅनल्सनी भाजपचा गरजेपेक्षा जास्तच प्रचार केला आहे. पण सत्य हे आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठीच संघर्ष करावा लागेल. प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्याने आपलं ट्वीट सेव्ह करण्याचं आवाहन करत म्हटलं की “जर भाजपची कामगिरी यापेक्षा चांगली झाली तर रणनीतीकाराचं काम सोडेन. “प्रशांत किशोर यांचं हे ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यानंतर आलं आहे. बंगाल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं की, “विधानसभा निवडणुकीपर्यंत ममता बॅनर्जी एकट्या राहतील.” त्या पार्श्वभुमिवर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे सहयोगी म्हणून काम करणारे प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.  


Prashant Kishor@PrashantKishorFor all the hype AMPLIFIED by a section of supportive media, in reality BJP will struggle to CROSS DOUBLE DIGITS in #WestBengal PS: Please save this tweet and if BJP does any better I must quit this space!10:22 AM · Dec 21, 2020

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button