breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पवार घराण्याशिवाय ‘चंपा’ला आता काहीच दिसत नाही, अजित पवारांनी उडविली चंद्रकांत पाटलांची खिल्ली

  • पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी केली टिका
  • भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नाला दिले सडेतोड उत्तर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पवारांच्या घराण्याशिवाय ‘चंपा’ला आता काहीच दिसत नाही. पवार साहेबांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. ते राजकारणातून कसे सन्यास घेतील?. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, यासाठीच पवार साहेब आजच्या प्रतिकूल परिस्थितीतही स्वतः फिरत आहेत, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली.

भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी पवार कुटुंबातील तरुण आमच्या संपर्कात आहेत. भविष्यात ते आमच्या पक्षात येणार आहेत. आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे म्हटले होते. या वक्तव्याचा हावाला देत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची खिल्ली उडवली.

चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, योगेश बहल, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, फजल शेख आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे राजकारणातून सन्यास घेणार, हे अनेकदा बोलले जाते. परंतु, तसे होत नाही. पवार साहेबांनी आख्ख आयुष्य राजकारणात घालवलं आहे. 55 आमदार असताना 50 आमदार निघून गेले. तरी पवार साहेब डगमगले नाहीत. पुन्हा जोमाने ते कामाला लागले. आजही तेवढ्याच तत्परतेने ते काम करताना दिसत आहेत, असेही पवार यावेळी म्हणाले.

खडसे, तावडेंची तिकीटे का कापली ?

पाच वर्षापूर्वी एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना भाजपने तिकीटे का दिली. आणि यावेळी त्यांना मुद्दामहून तिकीटे दिली नाहीत. प्रकाश मेहता, राज पुरोहित यांची देखील तिकीटे कापली गेली. पाठीमागच्या निवडणुकीत तिकीटे दिली गेली आणि आताच का कापली गेली, याचे उत्तर भाजपवाल्यांनी लोकांना दिले पाहिजे. तिकीटे कोणाला द्यायची आणि कोणाची तिकीटे कापायची हा ‘चंपा’चा अधिकार आहे, त्यांनी याची उत्तरे दिली पाहिजेत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button