breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पवारसाहेब… वडीलस्थानी, त्यांच्याविरुद्ध लढणार नाही – उदयनराजे

सातारा, महाईन्यूज

राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसले यांना दिलासा देणारी बातमी आहे. विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभेची पोटनिवडणुक होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी आलं. ते साताऱ्यात बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, “शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी”

दरम्यान, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध शरद पवारांनी लढावं अशी इच्छा डब्बेवाला संघटनेचे नेते सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार उदयनराजेंविरुद्ध निवडणूक लढवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

श्रीनिवास पाटील रिंगणात?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होणार असल्याचं मानलं जात आहे. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पोटनिवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button