breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

42 कोटींचा महसूल बुडविणा-या पालकमंत्री चंद्रकांत पाटलांंनी राजीनामा द्यावा

  • पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निषेध

पिंपरी ( महा ई न्यूज ) – राज्याचे महसूलमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करुन बिल्डरधार्जिणी निर्णय घेतला. त्याच्या निर्णयामुळे शासनाचा तब्बल 42 कोटी रुपये महसूल बुडविला आहे. त्यामुळे पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्टाचार करणा-या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसने केली आहे.

पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आज (शुक्रवारी) सायंकाळी 4 वाजता शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक राजू मिसाळ, पंकज भालेकर, राजू बनसोडे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, सुलक्षणा शिलवंत(धर), युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्ष कु. वर्षा जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, संदीप उर्फ लाला चिंचवडे, संजय लंके, अमोल भोईटे, बिपीन नाणेकर, अलोक गायकवाड, मयुर जाधव, सचिन औटे, संजय औसरमल, सनी डहाळे, प्रतिक साळुंके, दिनेश पटेल, कुंदन गोसावी इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संजोग वाघेरे म्हणाले की,  हाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पदाचा दुरूपयोग करून बिल्डरधार्जींना निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाने राज्य शासनाचे ४२ कोटींचा महसूल बुडविल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. तसेच या संपूण प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होईपर्यंत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button