breaking-newsराष्ट्रिय

‘पप्पू’द्वारे महागाई वाढवण्याची शिफारस करणाऱ्याला नोबेल, भाजपा नेत्याची टीका

‘जागतिक दारिद्रय़ निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल सोमवारी जाहीर झाले. त्यानंतर विविध स्तरांतून बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं जात असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. तसंच बॅनर्जींना मिळालेल्या नोबेलबाबत ट्विट करताना हेगडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने जाहीरनाम्यात समावेश केलेल्या ‘न्याय’ योजनेच्या संकल्पनेची मांडणी करण्यात अभिजीत बॅनर्जी यांची महत्त्वाची भूमिका होती. गरिबी हटवणारी ‘न्याय’ योजना असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. याबाबत ट्विट करताना हेगडे यांनी, “ज्या व्यक्तीने ‘पप्पू’च्या माध्यमातून महागाई आणि करप्रणाली वाढवण्याची शिफारस केली होती, त्या व्यक्तीला 2019 चा नोबेल पुरस्कार मिळाला. न्याय योजनेचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला नोबेल मिळाल्याबाबत ‘पप्पू’ला आनंद झाला असेल” असं म्हटलं. पण, त्यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांकडून हेगडे यांच्यावरच टीका होत असून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न होत आहे.

Anantkumar Hegde@AnantkumarH

Yes, the man who recommended #inflation & #tax rates to be raised for our country via #Pappu, has been recognized and awarded #NobelPrize2019.

Pappu can really feel proud of his #NYAY proponent while the poor nation missed out the benefits!!!!!!!!!!५७२५:१७ म.उ. – १४ ऑक्टो, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता२८९ लोक याविषयी बोलत आहेत

Anantkumar Hegde@AnantkumarH

Yes, the man who recommended #inflation & #tax rates to be raised for our country via #Pappu, has been recognized and awarded #NobelPrize2019.

Pappu can really feel proud of his #NYAY proponent while the poor nation missed out the benefits!!!!!!!!!!५७२५:१७ म.उ. – १४ ऑक्टो, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता२८९ लोक याविषयी बोलत आहेत

Anantkumar Hegde@AnantkumarH · 21h

Yes, the man who recommended #inflation & #tax rates to be raised for our country via #Pappu, has been recognized and awarded #NobelPrize2019.

Pappu can really feel proud of his #NYAY proponent while the poor nation missed out the benefits!!!!!!!!!!

Parul Nigam@ParulNigam9

He he……Mr Hegde pls also advice your finance minister as to how we can get our economy back on tracks.८:३८ म.उ. – १४ ऑक्टो, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयताParul Nigam यांची इतर ट्विट्स पहा

जागतिक दारिद्रय़ निर्मूलनासाठीच्या संशोधनाला पुरस्कार –

‘‘बॅनर्जी, डफलो, क्रेमर यांच्या संशोधनामुळे जागतिक दारिद्रय़ाशी सामना करण्याच्या आमच्या क्षमतेत भरपूर सुधारणा झाली. प्रयोगावर आधारित त्यांच्या नव्या दृष्टिकोनामुळे केवळ दोन दशकांत विकासात्मक अर्थशास्त्राचे स्वरूप बदलले आणि आता या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे,’’ अशा शब्दांत नोबेल निवड समितीने पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला. बॅनर्जी आणि फ्रेंच वंशाच्या अमेरिकी संशोधक डफलो यांनी प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन केले, तर क्रेमर हे हार्वर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. डफलो अर्थशास्त्रात नोबेल मिळालेल्या दुसऱ्या महिला आणि सर्वात तरुण विजेत्या आहेत. या पुरस्काराची ९ लाख १८ हजार डॉलर्सची रक्कम या तिघांना विभागून देण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे अमर्त्य सेन यांना यापूर्वी १९९८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. त्यानंतर हा सन्मान मिळालेले अभिजित बॅनर्जी हे दुसरे बंगाली आहेत. क्रेमर हे विकास अर्थशास्त्रज्ञ असून ते सध्या हार्वर्ड विद्यापीठात विकासात्मक समाज विषयाचे प्राध्यापक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button