breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अभिनेत्री मानसी नाईकच्या छेडछाड प्रकरणी एकाला अटक

पुणे |महाईन्यूज|

अभिनेत्री मानसी नाईकचा विनयभंग आणि छेडछाड झाल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध साकीनाका पोलिस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. राञी हा गुन्हा रांजणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. रांजणगाव पोलिसांनी तात्काळ अजय कल्याणकर (रा.पुणे) याला अटक करण्यात आली आहे तर इतर दोन आरोपी यांनी न्यायालयात जामीन घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

अभिनेत्री मानसी नाईकचा विनयभंग व त्यांच्या आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर याबाबत मानसीने मुंबईत साकीनाका पोलिस स्टेशनला आपली तक्रार दाखल केली. तसेच आरोपी हे शिरुर शहरातील वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली.

शिवसेनेच्या जिल्हा युवासेनेचे पदाधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य म्हणून भाऊ कदम, कुशल बद्रीके, प्राजक्ता हनमघर आदींसह प्रसिध्द अभिनेत्री मानसी नाईक दोन दिवसांपूर्वी रांजणगावमध्ये आले होते. यावेळी इतर कलाकारांचे सादरीकरण होत असतानाच नाईक यांना हा कार्यक्रमाच्या नियोजनात असलेल्या एका दांपत्याने त्यांना अर्वाच्च भाषेत वागणूक दिली. दरम्यान याच वेळी एका २१ वर्षीय युवकाने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन त्यांना लज्जा उप्तन्न होईल अशी वर्तणूक करताना नाईक यांनी संताप व्यक्त करताच या दांपत्याने त्या युवकाला तेथून पळवून लावले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button