breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींचा आज गुजरात दौरा, अनेक योजनांचं करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय गुजरातच्या दोऱ्यावर आहेत. ते सुरतमध्ये पोहोचले असून वलसाडजवळील जुजवा गावात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) लाभार्थ्यांच्या सामूहिक ‘ई-गृहप्रवेश’ कार्यक्रमाला मोदी जाणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ते प्रमाणपत्राचं वाटप करतील. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गुजरातमध्ये १ लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

गुजरात फॉरेंसिक सायन्स विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यालाही ते उपस्थिती लावून मार्गदर्शन करणार आहेत. जुनागडमध्ये ते काही प्रकल्पांचं उद्घाटन करतील. जुनागढ येथील गुजरात मेडिकल अॅण्ड एज्युकेशन रिसर्च सोसायटीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वलसाडमध्ये कपराडा क्षेत्रातील सुदूर गावाच्या फायद्यासाठी 586 कोटी रुपयांच्या अॅस्टल पाणी प्रकल्पाचे भूमीपूजन ते करतील. येथे ते जनसभेलाही संबोधित करतील.

संध्याकाळी जवळपास साडेसहाच्या सुमारास मोदी सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या बैठकीलासुद्धा जाणार आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत तर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शाह आणि माजी उप पंतप्रधान लाल कृष्ण आडवाणी मंदिराचे ट्रस्टी आहेत. त्यामुळे अमित शाह या बैठकीला हजर राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ते पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी गुजरातमधील भाजपा नेत्यांची बैठक घेऊ शकतात.

यापूर्वी, मोदी 20 जुलैरोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार होते पण त्यावेळी दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, परिणामी मोदींनी त्यांचा दौरा पुढे ढकलला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button