breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त स्वच्छता कर्मचा-यांचा सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड-पिंपळे निलख परिसरात सेवा सप्ताह

वाकड |महाईन्यूज|

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड-पिंपळे निलख परिसरात सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. कोरोना विषाणू महामारीत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या साफसफाई अधिकारी व कर्मचा-यांचा विशेष सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आला. तसेच यामध्ये महिला कर्मचारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्वताःचा जीव धोक्यात घालून आपल्या परिसराची स्वच्छता करणा-या करोना योध्दा सफाई कामगारांचा विशेष सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येत आहे. यावेळी स्थायी समिती माजी अध्यक्षा, विद्यमान नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड म्हणाल्या कि, “आपल्या सर्वांचे या कोरोना काळात लोकांच्या सेवेकरिता योगदान सर्वात मोठे आहे. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता व प्रोत्साहन देण्यासाठी आजच्या दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपणा सर्वांचे आरोग्य चांगले निरोगीमय रहावे, तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त करते. यापुढे देखील नागरिकांची सेवा आपल्या हातून घडो हीच सदिच्छा व्यक्त करते.”

यावेळी सफाई कर्मचारी सपना अडसूळ यांचा वाढदिवस नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, सफाई कर्मचारी व अधिकाऱ्यांचा वतीने साजरा करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button