breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘नो वॉटर नो वोट’बाबत नगरसेवक तुषार कामठेंची सोसायटीधारकांना महत्वाची सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक 26 वाकड, पिंपळे निलख प्रभागातील सोसायटीधारकांनी पाणी टंचाईच्या विरोधात मुक मोर्चा काढून येणा-या विधानसभा निवडणुकीत “नो वॉटर नो वोट”चा नारा दिला. यावरून प्रभागातील नगरसेवक तुषार कामठे यांनी या सोसायटीधारकांना महत्वाची सूचना केली. पाणी टंचाईला विधानसभा सदस्य अथवा लोकप्रतिनिधींना जबाबदार न धरता मला जबाबदार धरावे, कारण ही समस्या महापालिकेशी संबंधीत आहे, असे नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे.

भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी विशालनगर सोसायटी रहिवासी संघाला निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी तसे नमूद देखील केले आहे. पाणी समस्या ही पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधीत आहे. पाणी टंचाई झाली हे मी मान्य करतो. परंतु, यासंदर्भात विधानसभा सदस्य अथवा लोकप्रतिनिधींना जबाबदार धरू नये. यासंदर्भात आम्ही कमी पडलो, याचे प्रायश्चित्त होत आहे. त्याबद्दल आपण सोसायटीधारकांची माफी मागत आहे, असे देखील कामठे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

मतदानावर बहिष्कार हा लोकशाहीला घातक

पाणी टंचाईला सामोरे जात असताना आपण मतदानाचा हक्क न बजावणे म्हणजे लोकशाहीला घातक ठरणारे आहे. याचा दोष आमदारांना न देता त्यांच्या निवडणुकीत आपण मतदानाचा हक्क बजवावा. तुमचा रोष असेल तर तो महापालिका निवडणुकीत माझ्यावर काढावा, अशी देखील स्पष्ट सूचना कामठे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आपण सर्वजण यावर मार्ग काढू. आपण सदैव तुमच्याबरोबर असल्याचे देखील कामठे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button