breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

नेहरु आणि राजीव गांधींनंतर फक्त नरेंद्र मोदीच – रजनीकांत

नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीदेखील नरेंद मोदींचं कौतुक केलं असून माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधी यांच्यानंतर मोदी करिष्मा असलेले नेते असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जाणार असल्याचंही रजनीकांत यांनी सांगितलं आहे.

‘हा विजय नरेंद्र मोदींचा विजय आहे. ते करिष्मा असलेले नेते आहेत. भारतात जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधी यांच्यानंतर मोदीच करिष्मा असलेले नेते आहेत. मी त्यांच्या शपथविधीसाठी जाणार आहे’, असं रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

ANI

@ANI

Actor turned politician Rajinikanth in Chennai, Tamil Nadu: This victory is a victory for Modi. He is a charismatic leader. In India after JL Nehru and Rajiv Gandhi he is now a charismatic leader. I will be going for the swearing in ceremony of Narendra Modi ji.

2,234 people are talking about this

लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनातून रविवारी संध्याकाळी या याबाबतची माहिती देण्यात आली. राष्ट्रपती भवनात गुरुवारी, ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता शपथविधी समारंभ होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधानांना आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपती कोविंद यांनीही ट्वीट करून शपथविधीबद्दल माहिती दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button