breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नेताजी शुभाष चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना पालिकेतर्फे अभिवादन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास  सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,  अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य अमित गावडे,  नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शले, मीनल यादव, शिक्षण मंडळाचे माजी सभापती गजानन चिंचवडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे सोमनाथ साबळे आदी उपस्थित होते.

नेताजी बोस आणि बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त महापौरांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. देशाभिमान ओतप्रोत भरलेल्या नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे  यांच्यामध्ये  उत्तम संघटन कौशल्य होते. तरुणपिढीमध्ये संघटनात्मक बांधिलकी रुजावी यासाठी त्यांनी विशेष कार्य केले.  त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहिल, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button