breaking-newsराष्ट्रिय

नीरव मोदीच्या पत्नीविरुद्ध इंटरपोलचे रेड कॉर्नर नोटीस

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेला अनेक कोटींचा गंडा घालून परदेशात पळून गेलेला आणि ब्रिटनमधील कारागृहात असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या पत्नीच्याही विरोधात आता इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेल्या आवाहनानंतर इंटरपोलने ही कारवाई केली आहे. नीरव मोदीच्या विरोधात यापूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी झाली आहे.

पंजाब नॅशनल बँकेला सुमारे दोन अब्ज डॉलरचा चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीला गेल्यावर्षी मार्चमध्ये ब्रिटनमध्ये अटक झाली असून तो ब्रिटनच्या कारागृहात आहे. त्याला भारतात आणण्यासंबंधीचा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात भारतातही त्याच्याविरोधात गुन्हा नोंद आहे. त्यात ईडीने केलेल्या कारवाईत गेल्या जुलैमध्ये नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. त्यात जैसलमेर येथील ४८ कोटींची जमीन व पवनचक्की, मुंबईतील वरळी येथील समुद्र महलमधील ४ फ्लॅट, अलिबागमधील फार्म हाऊस, लंडनमधील फ्लॅट आणि बँकेतील खाती यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button