breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

निर्भया खटला : फाशीचं जन्मठेपेत रुपांतरत करण्याची पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

निर्भया सामुहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका म्हणजे बचाव याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करावी यासाठी त्याने ही विनंती याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटला स्थगिती  देण्यासही कोर्टाने नकार दिला आहे. ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमंतीने पवनची याचिका फेटाळली.

पवनने आपल्या याचिकेत म्हटले होते की, घटना घडली त्यावेळी तो अल्पवयीन होता. याप्रकरणी त्याची पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे.

न्या. एन. व्ही. रमन्ना, न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन फली नरीमन, न्या. आर. भानुमती आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सकाळी १०.२५ वाजता पवनच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली. क्युरेटिव्ह याचिकेची सुनावणी ही बंद खोलीमध्ये केली जाते, त्यानुसार ही सुनावणी देखील बंद खोलीत पार पडली. यापूर्वी उर्वरित तीन दोषींची क्युरेटिव्ह याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे.

दरम्यान, पवनकडे आता राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच दुसरीकडे अन्य दोषी अक्षय सिंह याने देखील शनिवारी राष्ट्रपतींसमोर पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली होती. कनिष्ठ कोर्टाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील चारही दोषींच्या नावे डेथ वॉरंट जारी करीत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारिख निश्चित केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button