breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

निर्भयाची आईने निर्भयाच्या दोषींना माफ करावं…एका जेष्ठ वकीलांचा अजब सल्ला…

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली आली आहे. यावरून जेष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाची आई आशा देवी यांना एक अजब सल्ला दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्याप्रकारे भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ केले. त्याचप्रकारे निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ केले पाहिजे, असे इंदिरा जयसिंह यांनी म्हटले आहे.

इंदिरा जयसिंह म्हणाल्या, “मी आशा देवी यांचे दु:ख समजते. तरी सुद्धा मी त्यांना सांगेन की, सोनिया गांधी यांनी आपण मृत्यूदंडाच्या विरोधात आहे, असे सांगत राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी नलिनीला माफ केले होते. तसेच, निर्भयाच्या आईने केले पाहिजे. आम्ही आपल्या निर्भयाची आई सोबत आहेत. मात्र, मृत्युदंडाच्या विरोधात आहोत.”

दुसरीकडे, निर्भयाची आई आशा देवी यांनी इंदिरा जयसिंह यांचा सल्ला फेटाळून लावला आहे. आशा देवी म्हणाल्या, “मला अशाप्रकारे सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत? संपूर्ण देशाला वाटते की, दोषींना फाशी झाली पाहिजे. फक्त यांसारख्या लोकांमुळे बलात्कार पीडितांसोबत न्याय होत नाही.”

याचबरोबर, इंदिरा जयसिंह यांनी असा सल्ला देण्याची हिम्मत तरी कशी केली असा सवाल आशा देवी यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत इंदिरा जयसिंह यांची सुप्रीम कोर्टात भेट झाली. त्यावेळी त्यांनी एकदाही माझ्याबद्दल विचारले नाही. मात्र, त्या दोषींबद्दल बोलत आहेत. काही लोक बलात्काऱ्यांना समर्थन देत रोजीरोटी कमवतात. त्यामुळे बलात्काराच्या घटना बंद होत नाही, असे आशा देवी यांनी सांगितले.

दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही गुन्हेगारांना आता २२ जानेवारीऐवजी १ फेब्रुवारी रोजी फासावर लटकवण्यात येणार आहे. तसे डेथ वॉरंट दिल्लीच्या कोर्टाने शुक्रवारी जारी केले. त्यानुसार, चौघांना १ फेबुवारी रोजी सकाळी ६ वाजता फासावर चढविण्यात येईल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी हे डेथ वॉरंट जारी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button