breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नियमबाह्य मेट्रोचे काम स्थगित करा – विरोधी पक्षनेते दत्ता साने

  • मेट्रोकडून महापालिकेच्या पदाधिका-यांना प्रकल्पांविषयी माहिती गुलदस्त्यात

पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्वारगेट ते पिंपरी मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोच्या प्रकल्पांविषयी महापालिका पदाधिका-यांनी मागितलेल्या माहितीच्या पत्राला उत्तर दिले जात नाही. महामेट्रोने अनेक कामे नियमबाह्य कामे सुरु आहेत. त्या कामाची माहिती गुलदस्त्यात ठेवली जात आहे. तसेच महापालिकेच्या पदाधिका-यांना जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यत मेट्रो ठेकेदारांकडून मजल गेली आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील मेट्रोचे काम स्थगित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी केली

पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापाैर राहूल जाधव यांना पत्र दिले आहे. त्यात पत्रात म्हटले आहे की, पुणे – पिंपरी चिंचवड शहरात जेव्हापासून मेट्रोचे काम सुरु झाले आहे. तेव्हापासून मेट्रोचे काम काही ना काही वादात अडकले आहे. पुणे मेट्रोच्या कामात झाडांची कत्तल रोखणे, बी.आर.टी. मार्गातील मेट्रोचे पिलर तोडणे, दापोडी ते पिंपरी दरम्यानचे मेट्रोचे पिलर काढले,पुणे मेट्रोबाबतचे नकाशे, आराखडे व अनुषंगिक माहिती मिळणे, पिंपरी चिंचवड मेट्रोच्या कासारवाडी येथील पिलरचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असले, त्यावर मेट्रोवर कारवाई करणे इत्यादी मेट्रोशी संबंधित असलेली पत्रे दिली.

परंतु अद्याप पर्यंत एकाही पत्राचे उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे मेट्रो स्थानिक स्वराज्य संस्थेतील विश्वस्तांनाच विचारत नाही तर सर्वसामान्य नागरीकांना कशी वागणूक देत असेल. याचबरोबर मेट्रोच्या सहयोगी कंपनीच्या कर्मचा-यांचे वेतन सुमारे सहा महिने थकवल्यामुळे कर्मचा-यांनी आंदोलन केले तेव्हा मी स्वत: कर्मचा-यांची भेट घेऊन त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविला. कासारवाडी येथे मेट्रोचे काम चालू असताना मेट्रोची क्रेन कोसळली सुदैवाने जिवित हानी झाली नाही परंतु मेट्रोचा हलगर्जीपणा व नागरीकांच्याप्रति असुरक्षितेचा मुद्दा समोर आला.

मागील आठवड्यातच मा. स्थायी समितीचे अध्यक्ष कामानिमित्त रात्री ११ वाजता मनपा मुख्य कार्यालयात निघाले असता त्यांना मोरवाडी चौकात मनपात जाणेस ऱोखले व रस्ता बंद केला असल्याचे सांगितले त्यांनी पोलिस परवानगीची प्रत मागितली असता त्यांना अपमानास्पद वागूणूक देऊन त्यांनाच चक्क खाजगी गुंडामार्फत जिवे मारण्याची धमकी दिली, हा प्रकार अतिशय गंभीर आहे.  त्याठिकाणी रस्ता बंद करण्याची परवानगी आहे तर मेट्रोने मनपाच्या आत्पतकालिन विभागास कळविणे गरजेचे होते. तसेच सर्वसामान्य नागरीकांना कळण्यासाठी तिथे रस्ता बंद असलेबाबतचा फलक लावणे गरजेचे होते. परंतु अद्याप त्या ठिकाणी फलक लावलेला नाही. एकुण मेट्रोचा कारभार मनमानी पध्दतीने चाललेला आहे. मनपाच्या सदस्यांनी एखादी माहिती मागितल्यास त्याला केराची टोपली दाखविली जाते.

त्यामुळे आपणांस विनंती आहे की, मा. स्थायी समिती सभापती यांना जिवे मारल्याची धमकी दिल्याच्या निषेर्धात व  मेट्रो प्रकल्पाचे काम करताना आवश्यक त्या परवानगी न घेता नियमभंग करीत काम चालू आहे. त्यामुळे आवश्यक त्या परवानग्या तसेच नियमाचे पालन करीत नाही तोपर्यंत मेट्रोचे कामास स्थिगिती देण्यात यावी, असे साने यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button