breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमनोरंजन

Watch KGF Chapter 2 Teaser: यशच्या वाढदिवशी केजीएफ चॅप्टर 2 चा टिझर रिलीज

केजीएफ चॅप्टर 1 (KGF Chapter 1) या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला कन्नड अभिनेता यशच्या 34व्या वाढदिवशी आज या चित्रपटाचा सिक्वेल केजीएफ चॅप्टर 2 चा टिझर (KGF Chapter 2 Teaser) रिलीज करण्यात आला. केजीएफने कन्नड चित्रपटसृष्टीत 200 कोटींचा व्यवसाय करणारा पहिल्या चित्रपटाचा मानही मिळवला. सर्व चाहत्यांना आणि यशला एक सरप्राईज गिफ्ट म्हणून 8 जानेवारी रोजी यशच्या वाढदिवशी केजीएफ चॅप्टर 2 चा टिझर रिलीज झाला आहे. यशने सोशल मीडियावरुनच टिझर रिलीज झाल्याची घोषणा केली आहे.

“A promise was once made” या शब्दांनी हा टिझर सुरू होतो आणि “That promise will be kept.” या शब्दांनी तो संपतो. कन्नड सुपरस्टार रॉकी भाईचे काही सीन्स दाखवून या स्टारला वाढदिवसाच्या “Happy Birthday Rocking Star Yash.” अशा शुभेच्छा देऊन हा टिझर संपतो.

सत्ता संघर्षाची पहिल्या भागातील कथाच या दुसऱ्या भागात दिसते आहे. यशसोबतच संजय दत्त, रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांनीही या चित्रपटात भूमिका साकारलेल्या दिसत आहेत. या 2 मिनिटं 16 सेंकंदांच्या टिझरने अनेक चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ‘तुम्ही सगळ्यांनी अधीराच्या भूमिकेला आतापर्यंत दिलेलं प्रेम अवर्णनीय आहे. त्यामुळे #KGF2Teaser शेअर करतोय,’ असा मेसेज लिहून संजय दत्तनी हा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button