breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“….नाहीतर तुमची घमेंड उतरवेन”; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

मुंबई – “अजित पवार साहेब, तुमची भाषा नीट करा, नाहीतर एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला. निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशा शब्दात अजित पवारांनी निलेश राणेंवर हल्लाबोल चढवला होता.

वाचा :-‘निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’, अजित पवारांचे टीकास्त्र

“फार कमी नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांना अनेक वर्ष मंत्रिपदं मिळाली, तरी पण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवार यांचं नाव घ्यावं लागेल. अजित पवार साहेब, भाषा नीट करा तुमची, नाहीतर हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा निलेश राणेंनी ट्विटरवरुन दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, त्यापाठोपाठ नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना भाजप नेते निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. निलेश राणेंनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, अजित पवार म्हणाले की, ते वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का? पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असा टोला पवारांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button