breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराष्ट्रिय

नाशिक बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नाशिक । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस जळून खाक झाली. बसला लागलेल्या आगीत 10 ते 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस जळून खाक झाली. बसला लागलेल्या आगीत 10 ते 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. तसेच, “या अपघाताप्रकरणी नाशिक महापालिका आयुक्त, कलेक्टर आणि एसपी यांच्याशी माझी चर्चा झाली. अपघातात 11 जणांचा मृत्यू आणि जवळपास 38 जण जखमी झाल्याचे समजते. जखमी प्रवाशांवर तातडीने उपचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

शिवाय, “खासगी रुग्णालयांतही या जखमींवर उपचार करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. यवतमाळवरून मुंबईच्या दिशेने ही बस जात होती. त्यावेळी एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. या अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. 3 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, जखमींवरील सर्व उपचार शासनातर्फे करण्यात येणार असून, अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 10 ते 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून हा भीषण अपघात झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये आठ ते दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाकडून अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. स्लीपर बसमध्ये सुमारे 30 प्रवाशी होते, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक गुड्डू यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button