breaking-newsपुणे

नाशिकमधल्या कपालेश्वर मंदिराचे दगड कोसळले

नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचे दगड कोसळ्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. मात्र दगड कोसळल्याची घटना घडल्यानंतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नाशिकमधल्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांमध्ये या कपालेश्वर मंदिराची गणना होते. कपालेश्वर मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात आहे. पेशव्यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आले की गोदावरी नदी आहे. तसेच जवळच रामकुंडही आहे. या रामकुंडात प्रभू रामचंद्रांनी दशरथाचे श्राद्ध केले होते अशी श्रद्धा आहे. कपालेश्वर मंदिराच्या समोर आणि गोदावरी नदीच्या पलिकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिरही आहे. हरिहर भेट महोत्सवाच्या वेळी कपालेश्वर आणि सुंदरनारायण मंदिरांमधून अनुक्रमे शंकर आणि विष्णू यांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात आणि त्यांची भेट घडवली जाते. श्रावणी सोमवारी आणि एरवीच्या सोमवारीही या कपालेश्वर मंदिरात कायम भाविकांची गर्दी असते.

याच कपालेश्वर मंदिराचे दगड कोसळण्याची घटना घडली आहे सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. नाशिकमधले प्राचीन वाडेही कोसळण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या. महापालिकेने पावसाळा सुरु होण्याआधी धोकादायक वाड्यांचा आढावा घेतला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button