breaking-newsआंतरराष्टीय

नायजेरियात शेतकरी आणि पशुपालक यांच्यातील झगड्यात 86 ठार

मकुर्डी (नायजेरिया) – नायजेरियात शेतकरी आणि भटके पशुपालक यांच्यातील झगड्यात 86 जण मारले गेल्याची माहिती देण्यात आली आहे. नायजेरियाच्या बार्किन लाडो पठारी भागात ही घटना घडली आहे.

गुरुवारी आदिवासी बेरोम शेतकऱ्यांनी फुलानी पशुपालकांवर केलेल्या हल्ल्यात पाच फुलानी पशुपालक मरण पावले होते. त्यानंतर शनिवारी फुलानी पशुपालकांनी बदला घेण्यासाठी आदिवासी बेरोम शेतकराऱ्यांवर हल्ला केला केला. तेव्हा मोठ्या प्रंमाणावर झालेल्या या हिंसाचारात एकूण 86 जण मरण पावल्याची माहिती देण्यात आली आहे. या भागात जमाती जमातीमध्ये होणाऱ्या चकमकी हा नेहमीचा प्रकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसात देशातील रियोम, बार्किन लाडी आणि जोस साऊथ या तीन भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारे झालेल्या हिंसाचारात 50 घरांना आगी लावण्यात आल्या. 15 मोटरसायकली आणि 2 वाहनेही पेटवून देण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अँडी एडी यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button