breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थापाड्या सत्ताधिशांचा नायनाट करण्याची शक्ती दे; पार्थ पवारांनी बजरंगबलींना मागितले वरदान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आज हनुमान जयंती असल्याने मावळ लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचाराचा शुभारंभ निगडी प्राधिकरणातील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन झाला. गेल्या पाच वर्षात मावळातील भाबड्या जनतेला आश्वासने देऊन नुसत्या गप्पा मारणा-या थापाड्या दशमुखी राजकीय रावणाचा नायनाट करण्याचे वरदान पार्थ पवार यांनी बजरंगबलींना मागितले. त्यानंतर ‘जय श्रीराम…’ ‘जय हनुमान…’चा जयघोष करत पवार यांची प्रचारसेना क्रांतीवीर चापेकर बंधु आणि मोरया गोसावींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीकडे रवाना झाली.

पनवेल, उरण, कर्जत, मावळ, लोणावळा, खालापूर, खोपोलीचा परिसर पादाक्रांत करून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज उद्योगनगरीत मुसंडी मारली. रावण युगात असुरांचा माजलेला नरसंहार आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घातलेले तांडव समसमान असून ज्याप्रमाणे बजरंगबलींनी रावणाचे जिने मुश्किल केले होते. तीच अवस्था पार्थ पवार यांच्या मावळातील उमेदवारीने विद्यमानांची झाली आहे. ज्याप्रमाणे बजरंगबलीने असुरी रावणाचा जंग जंग पछाडून श्रीरामाच्या हातून वध केला. त्याचप्रमाणे सत्ताधीश उग्रवादी, थापाड्या आणि थोतांड नेत्यांचा नायनाट करण्याची धुरा उमेदवार पार्थ पवार यांच्यावर आली आहे, असे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि सत्ताधिशांच्या जाचाला कंटाळल्या कष्टकरी, बेरोजगार तरुण, असुरक्षीत महिलांना वाटू लागले आहे.

दिनदुबळ्या, कष्टक-यांची ही भावना ओळखून पार्थ पवार यांनी आज सकाळी-सकाळी निगडी प्राधिकरणातील हनुमान मंदिरात बजरंगबलीचे दर्शन घेऊन सत्ताधीश असुरांचा नायनाट करण्याची शक्ती मागितली. बारामती आणि पिंपरी-चिंचवडला जसे नंदनवन फुलविले त्याच धरतीवर मावळचा परिसर हरीत, सुपीक, विकसीत करण्याचा निश्चय त्यांनी नागरिकांपुढे व्यक्त केला. त्याचवेळी जय श्रीराम…. जय हनुमान….चा जयघोष घुमला. पार्थ पवार यांचा विजय असो… अशा घोषणा दुमदुमल्या.

त्यानंतर निगडी, आकुर्डी, निगडी प्राधिकरण, चिंचवड, चिंचवड गाव, थेरगाव येथील हनुमान मंदिरात तसेच गणपती, महालक्ष्मी, मोरया गोसावींचे दर्शन पार्थ पवार यांनी घेतली. पिंपरी गावात जाऊन हनुमानेच दर्शन घेतले. श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेतले. याठिकाणी सुरू असलेल्या सप्ताह सोहळ्यात पार्थ पवार यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रचार ताफ्यात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button