breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांना त्रास होणार नाही याची अधिका-यांनी दक्षता घ्यावी, अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांची सूचना

पिंपरी / महाईन्यूज

शहरात सध्या दिवाळी सणाची धामधूम सुरू असून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. परंतु प्रभागात सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यावर राडारोडा पसरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सणापूर्वीच लवकरात लवकर किरकोळ विकासकामे मार्गी लावून नागरिकांना अधिक त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्याचे आदेश ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

प्रभाग अध्यक्षपदी रुजू झाल्यानंतर पहिलीच क्षेत्रीय बैठक काल (सोमवारी) पार पडली. ही बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सदर बैठकीत त्रिभुवन यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. यावेळी ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभाग, पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, उद्यान विभागासह सर्व विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

अध्यक्ष त्रिभुवन म्हणाले की, ‘ग’ प्रभागांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर खोदाई करून ठेवल्याने मोठ्या प्रमाणात राडारोडा पसरल्याचे चित्र सर्वच प्रभागात पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना थोडा त्रासही सहन करावा लागत आहे. दिवाळी सणदेखील अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने नागरिकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी जी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत ती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्याच्या, वीजेच्या, ड्रेनेज लाईनसंदर्भातील कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याचे त्रिभुवन यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ऑनलाईन बैठकीनंतर बाबासाहेब त्रिभुवन यांनी अधिकाऱ्यांसमवेत रहाटणी प्रभागातील विकासकामांच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button