breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपूर विभागातील रेल्वे नियंत्रण कक्षात तीन दिवसांत ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नागपूर – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नियंत्रण कक्षात एकाच दिवशी सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची अफवा पसरल्यामुळे खळबळ उडाली. परंतु तीन दिवसात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची अधिकृत माहिती डीआरएम शोभना बंदोपाध्याय यांनी दिली आहे. तसेच आजपासून तीन दिवस कार्यालय बंद राहणार असून नियंत्रण कक्षाचेही निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय कार्यालयासमोर नियंत्रण कक्ष आहे. या कक्षात मागील तीन दिवसात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. गुरुवारी चार रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यामुळे रेल्वेत खळबळ उडाली. काही जणांनी एका दिवशी सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची अफवा उडविली. परंतु पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या चार असून नियंत्रण कक्षाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याची माहिती बंदोपाध्याय यांनी दिली. डीआरएम कार्यालयातील अनेक कार्यालय यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांची संपूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button