breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपूरच्या सेव्हन स्टार रुग्णालयाला पालिकेने बजावली नोटीस

नागपूर – रुग्णांकडून अधिक शुल्क वसुली व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल गुरुवारी नंदनवन येथील सेव्हन स्टार रुग्णालय व्यवस्थापनाला नोटीस बजावून यासंदर्भात २४ तासांत स्पष्टीकरण मागितले आहे.

कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेव्हन स्टार रुग्णालय अधिकृत करण्यात आले आहे. रुग्णालयाने शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु ३ व ४ ऑगस्ट रोजी मनपाच्या पथकाने रुग्णालय परिसराची पाहणी केली व रेकॉर्डची तपासणी केली असता दिशानिर्देशांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याचे आयुक्तांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. याशिवाय अनेक बाबतीत रुग्णालयात अनियमितता आढळून आल्याने यासंदर्भात आयुक्तांनी स्पष्टीकरण मागितले आहे. सोबतच आपल्या विरोधात महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन आवश्यक सेवा कायदा मुंबई नर्सिंग होम कायद्यांतर्गत कारवाई का करू नये असे या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

या रुग्णालयात रुग्णांकडून नियमांच्या तुलनेत ५८ टक्के अधिक शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भातही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button