breaking-newsताज्या घडामोडी

‘नांदुरमध्यमेश्वर’ अभयारण्यात 17 हजार 607 पक्ष्यांची नोंद

नाशिक | महाईन्यूज |

रामसर हा विशेष दर्जा प्राप्त झालेल्या महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या ‘नांदुरमध्यमेश्वर’ पक्षी अभयारण्यात मागील वर्षांच्या तुलनेत पक्ष्यांचा मुक्काम वाढला आहे. अभयारण्य परिसरात केलेल्या गणनेत ११ हजार ९६१ पाणपक्षी, पाच हजार ६५६ झाडांवरील आणि गवताळ पक्षी अशा १७ हजार ६०७ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. अभयारण्याचा वर्धापन दिनही उत्साहात साजरा करण्यात आला.

वर्धापन दिनाचे औचित्य साधत पक्षीगणना करण्यात आली. यंदा पाऊस चांगला झाल्याने नांदुरमध्यमेश्वर धरण परिसरात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे. परिणामी हिवाळ्यात मुक्कामी आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांनी आपला मुक्काम वाढविला आहे. वन विभागाच्या वतीने अभयारण्य परिसरात वन अधिकारी, कर्मचारी, पक्षिमित्र, स्थानिक मार्गदर्शक, वन्यजीव अभ्यासक यांच्या मदतीने पक्षीगणना करण्यात आली. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कुरूडगाव, काथरगाव या पाच ठिकाणी पक्षीनिरीक्षण करण्यात आले. यामध्ये पाणपक्षी आणि झाडांवरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

या प्रगणनेत वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, गढवाल, ब्राह्मणी बदक, कापशी बदक, कॉमन पोचार्ड, विजन, लिटल क्रेक, बेलन्स क्रेक, स्पूनबिल, रिव्हर टर्न, नकटा बदक, टफ्टेड पोचार्ड, प्रॅटिन्कोल, कमळपक्षी, शेकाटय़ा, कॉमन क्रेन आणि मोठय़ा संख्येत गुलाबी मैना पक्षी आढळून आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button