breaking-newsराष्ट्रिय

नरभक्षक वाघाचे नाव मुस्तफा, मुस्लिम समाजात संताप

उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमधील पलिया येथील नरभक्षक वाघाचे नाव मुस्तफा ठेवण्यात आल्याने मुस्लिम समाजातून संताप व्यक्त होत आहे. मुस्लिम समाजातील संघटनांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाघाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.

पलिया येथील मुस्तफाबाद गावात एका वाघाने दहशत निर्माण केली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला २०१६ मध्ये पकडले होते. त्यानंतर त्याला लखनौतील प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात आले होते. या वाघाचे नाव मुस्तफा ठेवल्याची माहिती मिळताच खिरी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील काही लोकांनी लखीमपूर तहसील गाठले. या लोकांनी जिल्हाधिकारी शैलेंद्रकुमार सिंह यांना निवेदन देऊन इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद मुस्तफा यांचे नाव नरभक्षक वाघाला दिल्याने मुस्लिम समाजाच्या भावनांना दुखावल्या आहेत.

निवदेनात ४ वर्षीय वाघाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. मुस्तफाला २०१६ मध्ये खिरीतून जेरबंद करण्यात आले होते. मुस्तफाने ६ लोकांचा बळी घेतला असून त्याने एकाला गंभीर जखमीही केले होते. त्याच्या आक्रमक स्वभावामुळे अद्यापपर्यंत त्याला पर्यटकांसमोर आणले गेलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button