breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

नटश्रेष्ठ श्री गोपीनाथ सावकार ११० व्या जयंती निमित्ताने सं. ययाति आणि देवयानी नाटकाचा प्रयोग

मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार व दिप्ती भोगले यांचा सत्कार

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

नटश्रेष्ठ श्री गोपीनाथ सावकर  ११०व्या जयंती निमित्ताने सं. ययाति आणि देवयानी       नाटकाचा प्रयोग श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीच्या सहयोगाने दि. १२ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या प्रसंगी ‘मराठी रंगभुमी’ या नाट्य संस्थेच्या वतीने रंगभूमीची सेवा करणाऱ्या आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या माजी अध्यक्षा कीर्ति शिलेदार व  दीप्ती भोगले यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान श्री गोपीनाथ सावकार विश्वस्त निधीचे अध्यक्ष, अभिनेते अशोक सराफ यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

वि. वा. शिरवाडकर लिखित सं. ययातीआणि देवयानी हे नाटक श्री गोपीनाथ सावकार  यांनी रंगभुमीवर आणून एक दर्जेदार अभिजात नाट्यकृती बहाल केली.

 यातील पंडित जितेंद्र अभिषेकी यानी संगीतबद्ध केलेली नाट्यपदे रसिकप्रेक्षकांना अद्यापही भुरळ घालतात. श्री. गोपीनाथ सावकार यांनी मराठी रंगभूमीला दिलेले योगदान आणि संगीत नाटक संवर्धनाचे , नवनिर्मितीचे कार्य काही मोजकी मंडळी नेटाने आणि रंगभूमीची सेवा म्हणून करत आहेत. त्यातील एक मुख्य नाव म्हणजे शिलेदार कुटुंबिय !

कीर्ती शिलेदार आणि दीप्ती भोगले यांनी मराठी रंगभूमी या त्यांच्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून चांगल्या संगीत नाटकांची निर्मिती,संवर्धन करण्याचे कार्य केले आहे. तसेच संगीत रंगभूमीला नवनवीन तरुण कलाकार देण्यातही त्यांचे योगदान आहे. या त्यांच्या कार्यासाठी श्री गोपीनाथ विश्वस्त निधीच्यावतीने  त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 त्याचप्रमाणे मराठी रंगभुमी या संस्थेची निर्मिती असलेल्या सं ययाती आणि देवयानी या नाटकाचा प्रयोग  दि १२जानेवारी रोजी सायंकाळी ४वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे करण्यात आला आहे.

दर्दी , रसिक प्रेक्षक आणि विशेषतः आजचे तरुण प्रेक्षक यांच्यासाठी हे अनुभवणे, पहाणे ही एक मेजवानीच असेल   अशी माहिती श्री गोपीनाथ  सावकार विश्वस्त निधीचे विश्वस्त सुभाष सराफ यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button