breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार

नगर |महाईन्यूज|

नगर-सोलापूर महामार्गावर आंबिलवाडी फाट्याजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत. अरुणराव बाबुराव फुलसौंदर (वय ५५), अर्जुन योगेश भगत (वय १२), ताराबाई शंकर भगत (वय ६०) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून हे सर्व जण नगरचे आहेत. तर, अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अक्कलकोट-मालेगाव ही एसटी (क्र. एमएच १४, बीटी ३३३७) बस नगरकडे येत होती. या बसची व नगरकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारची नगर-सोलापूर महामार्गावरील आंबिलवाडी फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यु झाला असून हे तिघेही नगरचे रहिवासी आहेत. तर, अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button