breaking-newsमनोरंजन

तब्बल २० वर्षानंतर ‘या’ मराठी चित्रपटाची व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचा द डिसायपल हा चित्रपट ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवडण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे सर्व स्तरांतून कौतूक करण्यात येत आहे.

आशय आणि विषय या दोन्हीबाबती सरस असलेल्या मराठी चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल २० वर्षांनंतर दखल घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वात जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव म्हणजे ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’. १९३२ पासून सुरु असलेल्या या महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

“तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट ही आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टीम”, असं ट्विट रवी जाधवने केलं.

दरम्यान, व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात इ.स. १९३७ साली या चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button