breaking-newsक्रिडा

धोनीच्या निवृत्तीबाबत CSK चा शेन वॉटसन म्हणतो…

भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र या दौऱ्यातून माघार घेतली होती. तो भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत होता. ३१ जुलैपासून त्याने काश्मीर खोऱ्यातील १०६ TA बटालियन (पॅरा) सोबत भारतीय सैन्यात सेवा देण्यास सुरू केली होती. सुमारे २ महिन्यांनंतर तो स्वगृही परतला. सुमारे २ महिन्यांनंतर तरी तो क्रिकेटच्या मैदानावर परतेल, असे वाटत होते. पण नोव्हेंबरपर्यंत धोनी क्रिकेटपासून दूर राहणार आहे, अशी माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेला ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन याने धोनीबाबत मत व्यक्त केले आहे.

“धोनीचे जरी वय वाढत असले तरी त्याच्याकडे अजूनही कौशल्य आणि चपळता आहे. त्यामुळे निवृत्ती घ्यावी की आणखी खेळावे हा निर्णय सर्वस्वी त्याचा आहे. मैदानावर त्याची हालचाल, देहबोली युवा खेळाडूंना लाजवेल अशी आहे. धाव घेताना तो किती जलद धावू शकतो हे वेगळे सांगायची गरज नाही. यष्टिरक्षण हा क्षेत्र तर त्याने एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे तो जो काहीही निर्णय घेईल, तो योग्यच असेल”, असा विश्वास वॉटसनने धोनीबद्दल व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button