breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाबाबत मोठी बातमी; राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत शरद पवार घेणार निर्णय

बलात्काराचा आरोप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याने आज दिले आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत फेसबुकद्वारे विवाहबाह्य संबंधाची स्वतःच कबुली दिली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली.

यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण केल्याचे समजते. परंतु, पक्षाच्या प्रतिमेवर याचा होणारा परिणाम लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतील, असाही मतप्रवाह यात दिसत होता. याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच अंतिम निर्णय घेतील असे बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोणीतरी आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही. पण याबाबतीत आम्ही पक्षस्तरावर योग्य तो विचार करणार आहोत. महिला आरोप करते, धनजंय मुंडेंनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. असं असताना धनंजय मुंडेंना कोणीतरी जाणीवपूर्वक ब्लॅकमेल करत असेल आणि त्यात त्यांचा दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं जयंत पाटील यांनी याआधीच सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button