आंतरराष्टीय

कारवाया होताच तालिबानला पश्‍चाताप : ट्रम्प

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात गेली 19 वर्ष जे युद्ध सुरू आहे त्यात यापुर्वी कधीही नव्हता इतका मोठा तडाखा आम्ही तालिबानला दिला आहे. त्यामुळेच त्यांना आता पश्‍चाताप होऊ लागला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

तालिबान्यांनी अलिकडेच काबुलवर हल्ला केला. त्यात एका अमेरिकन सैनिकासह एकूण 11 जण ठार झाले. ट्रम्प यांनी तालिबानबरोबरची शांततेची चर्चा थांबवून तालिबानला मोठे तडाखे द्यायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांना आता काबुलवर केलेल्या हल्ल्याचा पश्‍चाताप होत असेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही त्यांच्याशी चर्चा करून शांतता प्रस्थापनेचा प्रयत्न करीत होतो. पण त्यांना शस्त्रसंघर्ष थांबवता आला नाही. त्यामुळे त्यांना आता आम्ही धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चेच्या एकूण नऊ फेऱ्या झाल्या होत्या. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच तालिबानने काबुलवर हल्ला केला. त्यामुळे अमेरिकेने ही चर्चेची प्रक्रिया बंद केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button