TOP NewsUncategorizedपुणे

धक्कादायक! लोणीकाळभोरला एकाच दिवसात तिघांची आत्महत्या

लोणी काळभोर येथे तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. कदमवाकवस्ती, कोरेगाव मुळ व कुंजीरवाडी या तीन गावात एकाच दिवसात या घटना घडल्या आहेत. यात एका १७ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार भावना जितन सोलंकी (वय १७, रा.घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती ), अभिषेक आनंदा गायकवाड (वय १९, रा. कोरेगाव मुळ) व गुलाब विष्णू आंबेकर (वय ४८, रा.कुंजीरवाडी) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. तिघांच्याही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

वाचाः ‘मी बिडी पित नसल्यानं ईडीची भीती वाटत नाही’, आठवलेंचं रिट्विट

भावना सोलंकी हिचा विवाह नुकताच ठरला होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भावना दिवसभर, तिच्या भावी पतीशी मोबाईलवरुन बोलत होती. दुपारी ४ च्या सुमारास आराम करण्याच्या नावाखाली ती खोलीत गेली. बराच वेळ बाहेर येत नसल्याने खोलीचा दरवाजा उघडला असता, घऱाच्या छताला ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळुन आले. खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

कुंजीरवाडी येथे गुलाब आंबेकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन, आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी ४.३०च्या सुमारांस उघडकीस आला. अविवाहीत असलेले आंबेकर हे गेले कांही वर्षापासुन आजारी होते. तसेच त्यांना काही दिवसापुर्वीच अर्धांगवायूचा झटकाही येऊन गेला होता. तिसऱ्या घटनेत कोरेगाव मुळ येथील अभिषेक गायकवाड या तरुणाने दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button