breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! माथेफिरु मुलाकडून आईची हत्या, औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना

औरंगाबाद: माथेफिरु मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केलेली आहे. ही धक्कादाय घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाळपूर या गावात घडलेली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. रमेश घुगे असं माथेफिरु मुलाचे नाव आहे. आरोपी रमेश हा मनोरुग्ण असून त्याच्यावर औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शशिकलाबाई घुगे असं मृत आईचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यातही एका दारुड्या मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलेली होती. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीने स्वत: घटनेची माहिती फोन करुन मामाला दिली होती आणि त्यानंतर घटनास्थळावरुन फरार झालेला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button