breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

धक्कादायक! भीषण स्फोटानं सांगली हादरली, एक ठार तीन गंभीर; अनेक वाहनं जळून खाक

सांगली: सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये जिलेटीन कांड्याचा भीषण स्फोट होऊन एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले असून दोन वाहनं जळून खाक झाल्याचं समजते आहे.तासगावपासून जवळच असलेल्या बस्तवडे गावात दुपारी चार वाजेच्या ही घटना घडली आहे.

डोंगर फोडण्याचा काम सुरू असताना जिलेटीन कांड्याचा स्फोट झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन गाड्या आणि पोलीस दाखल झालेले आहेत. मिळालेली माहिती अशी की, तासगावच्या पूर्व भागात बस्तवडे गावाजवळील डोंगर फोडताना भीषण स्फोट झाला. डोंगर फोडून सपाटीकरणाचं काम सुरू असताना जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला. बस्तवडे गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. तर घटनास्थळी 7 ते 8 आणखी कामगार असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा: अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button